नगरसेविका प्रेरणा होणराव यांच्या हस्ते ‘अमृतपेठ थेट बाजारपेठे’चा समारोप; पुढील उपक्रमासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही*

स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाचा समारोप नगरसेविका *प्रेरणा होणराव* यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

नगरसेविका प्रेरणा होणराव यांच्या हस्ते ‘अमृतपेठ थेट बाजारपेठे’चा समारोप; पुढील उपक्रमासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही* मुख्य फोटो
नगरसेविका प्रेरणा होणराव यांच्या हस्ते ‘अमृतपेठ थेट बाजारपेठे’चा समारोप; पुढील उपक्रमासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही* अतिरिक्त फोटो

लातूर, :* स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाचा समारोप नगरसेविका *प्रेरणा होणराव* यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला.

यावेळी नगरसेविका प्रेरणा होणराव यांनी अमृतपेठमध्ये सहभागी झालेल्या विविध उद्योजक व उत्पादकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनांची तसेच बाजारपेठेतील अडचणींची माहिती जाणून घेतली. स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तू व उत्पादनांची पाहणी करून त्यांनी उद्योजकांचे कौतुक केले.

समारोपप्रसंगी सहभागी उद्योजकांना *नगरसेविका प्रेरणा होणराव यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप* करण्यात आले. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, *पुढील ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सहकार्य करू*, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही नगरसेविका प्रेरणा होणराव यांनी दिली. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आगामी अमृतपेठमध्ये अधिकाधिक उद्योजकांना सहभागी होण्याची संधी मिळणार असून, स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अमृतपेठच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून, *स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार आणि स्थानिक व्यवसायांना चालना* देण्याचा उद्देश साध्य होत आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यात अमृतपेठ अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी, अमृत मित्र अमित पांडे* यांच्यासह सहभागी उद्योजक, उत्पादक व नागरिक उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 16-09-2026 News publication date | Time: 09:54 AM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 16-09-2026 News publication date | Time: 09:54 AM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement