स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने *अमृतच्या वतीने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम *दि. १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर* येथे उत्साहात पार पडला.
*लातूर, दि. १५ सप्टेंबर :* स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने *अमृतच्या वतीने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम *दि. १२ व १३ सप्टेंबर २०२६ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, विवेकानंद संस्कार संस्था सभागृह, लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर* येथे उत्साहात पार पडला.
या बाजारपेठेला *JSPM ग्रुप, लातूरचे उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर* यांनी भेट देऊन सहभागी उद्योजक व विक्रेत्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध स्टॉलला भेट देत स्थानिक पातळीवर तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच उद्योजकांच्या व्यवसायातील संधी, अडचणी आणि बाजारपेठेच्या गरजा याबाबत चर्चा केली.
*‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे थेट प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळाली. ग्राहकांनाही स्थानिक व स्वदेशी उत्पादनांची खरेदी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध झाले. अशा उपक्रमांमुळे स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
अमृतच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उद्योजकांना विविध योजना, प्रशिक्षण व व्यवसायविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. *‘अमृतपेठ’ हा त्याचाच एक महत्त्वाचा उपक्रम असून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत उद्योजकांना सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.*
यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी, अमृत मित्र अमित पांडे, अमृत मित्र प्रशांत कापसे, माजलगावचे सुमित धिरडे तसेच राजन भैय्या कुलकर्णी* उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment