मालेगावात के. बी. एच. एस. एस. फार्मसी कॉलेजमध्ये ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ उत्साहात साजरा

अमृत विश्वबंधुत्व दिन – विश्वबंधुत्व पंधरवडा’ अभियानांतर्गत मालेगाव येथील के. बी. एच. एस. एस. ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जाजूवाडी, मालेगाव कॅम्प येथे विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मालेगावात के. बी. एच. एस. एस. फार्मसी कॉलेजमध्ये ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ उत्साहात साजरा मुख्य फोटो
मालेगावात के. बी. एच. एस. एस. फार्मसी कॉलेजमध्ये ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ उत्साहात साजरा अतिरिक्त फोटो

मालेगावात के. बी. एच. एस. एस. फार्मसी कॉलेजमध्ये ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ उत्साहात साजरा

मालेगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने आयोजित ‘अमृत विश्वबंधुत्व दिन – विश्वबंधुत्व पंधरवडा’ अभियानांतर्गत मालेगाव येथील के. बी. एच. एस. एस. ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, जाजूवाडी, मालेगाव कॅम्प येथे विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.

स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मृतीनिमित्त सन २०२६ पासून ‘अमृत विश्वबंधुत्व दिवस’ हा विशेष उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’ या उदात्त विचाराला केंद्रस्थानी ठेवून समाजात विश्वबंधुत्व, मानवता, सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि सौहार्दाची भावना दृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते निवृत्त प्राचार्य प्रा. संजय पाठक यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार, वैश्विक बंधुभावाचा संदेश आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. युवकांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या सीमा ओलांडून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेने एकमेकांशी प्रेम, आपुलकी आणि सहकार्याने राहावे. तसेच समाजात सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. मानवतेचा आदर, परस्पर सहकार्य आणि एकतेची भावना हीच समृद्ध व सुसंस्कृत समाजाची पायाभरणी आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ‘अमृत’चे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता यांनी केले. त्यांनी विश्वबंधुत्व पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी या अभियानातील विचार आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार,हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: दीपक गुप्ता News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 03:28 PM News publication time | Views: 264 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: दीपक गुप्ता News publisher name | Date: 15-09-2026 News publication date | Time: 03:28 PM News publication time | Views: 264 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement