अमृत संस्थेतर्फे शिक्षण, प्रशिक्षणासह उद्योजक घडवण्यासाठी अर्थसाह्यही!; धुळे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन
धुळे : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनांसाठी पात्र असलेल्या धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी केले आहे.
त्यातील प्रमुख योजनांची यादी पुढे दिली आहे.
१. टायपिंगच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.
२. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण : UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग व विद्यावेतन.
३. कौशल्य विकास कार्यक्रम : रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि कौशल्य विकास.
४. उद्योजकता विकास : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि कर्ज व्याजपरतावा योजना.
५. CDAC आणि NILET अभ्यासक्रमासाठी आर्थिक मदत
पात्रतेचे निकष :
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवार खुल्या प्रवर्गातील (Open/General) असावा.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
लागणारी कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
हेमंत पाठक -91122 28772
धुळे जिल्हा व्यवस्थापक, अमृत
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment