स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता यावी आणि त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने आयोजित *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या स्वदेशी बाजारपेठेचे लातूरमध्ये दिमाखात उद्घाटन झाले.
लातूर, दि. १२ सप्टेंबर :* स्थानिक उद्योजक, उत्पादक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करता यावी आणि त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने आयोजित *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* या स्वदेशी बाजारपेठेचे लातूरमध्ये दिमाखात उद्घाटन झाले.
लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड येथील *विवेकानंद संस्कार संस्था सभागृहात* आयोजित या दोन दिवसीय प्रदर्शनात विविध स्थानिक उद्योजक व उत्पादकांनी आपल्या उत्पादनांचे आकर्षक स्टॉल उभारले आहेत. स्वदेशी, दर्जेदार आणि स्थानिक पातळीवर निर्मित उत्पादनांची विविधता पाहण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उद्घाटनप्रसंगी *विभाग व्यवस्थापक ओंकारजी शेटे* यांनी मार्गदर्शन करताना स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविणे आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी निर्माण करणे, ही ‘अमृतपेठ’मागील महत्त्वाची संकल्पना असल्याचे सांगितले. *प्रवीण दादा कस्तुरे* तसेच *रविशंकर जाधव, नगरसेवक लातूर* यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी *दीपक गायकवाड, MCED प्रकल्प अधिकारी* यांनी सहभागी उद्योजकांशी संवाद साधत व्यवसायवृद्धी, उत्पादनाची गुणवत्ता, ग्राहकांची गरज आणि उपलब्ध बाजारपेठेच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
*‘उत्पादक ते ग्राहक’* ही संकल्पना प्रत्यक्षात आणत अमृतपेठच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ, उत्पादनांना बाजारपेठ आणि ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लातूरकरांसाठी हे प्रदर्शन केवळ खरेदीचे व्यासपीठ न राहता स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणारे महत्त्वपूर्ण अभियान ठरत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी *जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, प्रशांत कापसे, सुमितजी धिरडे आणि कमलाक्षी कुलकर्णी* यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन *श्री अमितजी पांडे* यांनी केले.
दरम्यान, लातूरकरांनी कुटुंबासह अमृतपेठला भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि *‘स्वदेशीचा स्वीकार, स्थानिक उद्योजकांना साथ’* या भावनेला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment