महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अमृतचा पुढाकार परतवाडा येथे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ

दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी वरूड येथे अमृत पेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन कार्यक्रमास वरूड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. ईश्वर सलाम साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते अमृत पेठ बाजारपेठेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अमृतचा पुढाकार परतवाडा येथे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ मुख्य फोटो
महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अमृतचा पुढाकार परतवाडा येथे ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ अतिरिक्त फोटो

कार्यक्रमास अमरावती विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर हे विशेष उपस्थित म्हणून उपस्थित होते. तसेच अमृत अमरावतीचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश कथलकर, अमृत मित्र केदार चावरकर तसेच कार्यक्रमाच्या आयोजक ऋतु गणला देशपांडे यांची उपस्थिती होती. यासोबतच वरूडचे माजी नगराध्यक्ष मा. कडू सर हे देखील मंचावर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष मा. ईश्वर सलाम साहेब यांनी अमृत पेठ बाजारपेठेतील सर्व स्टॉलधारक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. वरूड शहर व परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी अमृतच्या माध्यमातून आणखी कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील, याबाबतही त्यांनी सकारात्मक चर्चा केली. वरूड नगरपरिषदेच्या माध्यमातून अशा उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर यांनी अमृतच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम व शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या संधींबाबत स्टॉलधारक तसेच उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली. अमृतच्या माध्यमातून युवक, महिला व उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविली.

माजी नगराध्यक्ष मा. कडू सर यांनीही अमृतच्या योजनांबाबत सकारात्मक भावना व्यक्त करून अमृतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना सदैव सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

उद्घाटन कार्यक्रमानंतर नगराध्यक्ष मा. ईश्वर सलाम साहेब, माजी नगराध्यक्ष मा. कडू सर तसेच विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर यांनी अमृत पेठेतील विविध स्टॉलची पाहणी केली, स्टॉलधारकांशी संवाद साधला तसेच उत्पादनांची खरेदी करून स्टॉलधारकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सर्व स्टॉलधारकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एकूणच, अमृत पेठ बाजारपेठेच्या माध्यमातून स्थानिक महिला, युवक व लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल वरूड येथे यशस्वीपणे पार पडले.

Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 12-09-2026 News publication date | Time: 06:24 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Kathalkar News publisher name | Date: 12-09-2026 News publication date | Time: 06:24 PM News publication time | Views: 51 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement