माहिती देण्यासाठी गाठीभेटी
मुंबई : राज्य शासनाची अमृत ही स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी दहिसर या मुंबईच्या उपनगरामध्ये जिल्हा व्यवस्थापक प्रणय तीर्थकर यांनी भेटीगाठी घेतल्या. त्यामध्ये गुजराती समाजातील महिला सदस्यांचाही समावेश होता. अमृत कौशल्य, अमृत बेकरी प्रशिक्षण, आरी वर्क, तसेच ब्युटी थेरपी यांबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. श्री. पाठक आणि श्री. दवे यांनी या योजना अधिकाधिक संभाव्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मदतीचे आश्वासन दिले. एकंदरीतच या योजनांबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment