सोलापूर जिल्हा कार्यालयात उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षणाचा दुसरा दिवस; ‘उद्योग नोंदणी आणि कागदपत्रे’ या विषयावर रंगणार विशेष सत्र!

सोलापूर जिल्हा कार्यालयात उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षणाचा दुसरा दिवस; ‘उद्योग नोंदणी आणि कागदपत्रे’ या विषयावर रंगणार विशेष सत्र!

सोलापूर जिल्हा कार्यालयात उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षणाचा दुसरा दिवस; ‘उद्योग नोंदणी आणि कागदपत्रे’ या विषयावर रंगणार विशेष सत्र! मुख्य फोटो
सोलापूर जिल्हा कार्यालयात उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षणाचा दुसरा दिवस; ‘उद्योग नोंदणी आणि कागदपत्रे’ या विषयावर रंगणार विशेष सत्र! अतिरिक्त फोटो

सोलापूर (दि. ०८ सप्टेंबर २०२६): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) अंतर्गत आज, मंगळवार दि. ०८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशिक्षणाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील नवउद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या व्यवसायाला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाच्या या दुसऱ्या दिवशी 'उद्योग नोंदणी आणि कागदपत्रे' (Udyam Registration & Documentation) या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यावहारिक विषयावर १ तासाचे विशेष प्रशिक्षण सत्र / वेबिनार होणार आहे.

या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'योगेश्वर नेट कॅफे, सोलापूर'चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. चिन्मय कलबुर्गी सर मार्गदर्शन करणार आहेत. श्री. कलबुर्गी सर हे 'श्रीविद्या इन्फोटेक'मध्ये तांत्रिक प्रशिक्षण व करिअर डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून कार्यरत असून, त्यांना बँकिंग, फायनान्स, तांत्रिक व व्यवस्थापन क्षेत्रातील १४ हून अधिक वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी Yes Bank, Axis Bank आणि Axis Securities मध्ये ऑपरेशन्स विभागात ८ वर्षे, तसेच योगेश्वर नेट कॅफेमध्ये Hardware & Network Technician म्हणून ३ वर्षे सेवा दिली आहे.

आज होणाऱ्या या सत्रात ते नवउद्योजकांना एमएसएमई (MSME) अंतर्गत 'उद्यम नोंदणी' कशी करावी, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या या उपक्रमास जिल्ह्यातील भावी उद्योजकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

पत्ता: १०८ A, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतीराज हॉटेलच्या पुढे, सात रस्ता, मोदीखाना, सोलापूर - ४१३००१. संपर्क क्रमांक: ९११२२२८७६८


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 04:10 PM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 04:10 PM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement