सोलापूर जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांच्याकडून 'अमृत'च्या कामाचे कौतुक; श्रेयस कुलकर्णी यांचा सन्मान
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने पार पडलेल्या विशेष बैठकीत जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांनी 'अमृत' संस्थेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी सोलापूरचे जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध योजना, उद्देश आणि सामाजिक कार्याची सविस्तर माहिती मॅनेजर जोशी यांना दिली. श्रेयस कुलकर्णी यांनी मांडलेल्या माहितीमुळे आणि 'अमृत'च्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे प्रभावित होऊन मॅनेजर मकरंद जोशी यांनी संस्थेच्या कामाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी जनता बँकेच्या वतीने श्रेयस कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यावेळी बोलताना म्हणाले, "अमृत संस्था अत्यंत स्तुत्य काम करत असून त्यांच्या योजना समाजातील घटकांसाठी लाभदायक ठरत आहेत. यापुढे बँकेचे कोणतेही काम किंवा तांत्रिक अडचणी असो, जनता बँक नेहमी अमृत संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील." सोलापूर जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांनी 'अमृत' संस्थेच्या उपक्रमांचे व आयोजनाचे मनापासून कौतुक केले. संस्थेची माहिती व योजना जाणून घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत, "आम्ही नेहमी अमृत संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे आश्वासन दिले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment