लातूर येथे EDP प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी अमृतच्या व विविध शासकीय योजनांची माहिती

अमृत स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे आयोजित *उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP)* कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थींना अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

लातूर येथे EDP प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी अमृतच्या व विविध शासकीय  योजनांची माहिती मुख्य फोटो
लातूर येथे EDP प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी अमृतच्या व विविध शासकीय  योजनांची माहिती अतिरिक्त फोटो

*लातूर, दि. ८ सप्टेंबर :* अमृत स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे आयोजित *उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP)* कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थींना अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रशिक्षणाची रचना *एकूण १० दिवसांची* असून, त्यामध्ये *४ दिवस प्रत्यक्ष (ऑफलाईन) प्रशिक्षण व ६ दिवस ऑनलाइन प्रशिक्षण* घेण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षणार्थींना व्यवसायाच्या विविध संधी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन, आर्थिक शिस्त, बाजारपेठेचा अभ्यास तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर* यांनी प्रशिक्षणार्थींना अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये युवक व उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या *व्याज परतावा योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास व प्रशिक्षणाच्या विविध योजना* तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रशिक्षणार्थींनी विविध योजनांबाबत माहिती जाणून घेत प्रश्न विचारले. अमृतच्या योजनांचा योग्य प्रकारे लाभ घेत *स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन* यावेळी करण्यात आले.

उद्योजकतेला चालना देत युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने EDP प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे.

अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर , लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 02:24 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement