अमृतच्या योजनांचा जनजागृतीसाठी अनुलोम सरसावले; अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या प्रचाराला वेग

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (*अमृत)च्या वतीने लातूर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* प्रदर्शनाच्या प्रचार-प्रसारासाठी **अनुलोम सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.* अमृतच्या विविध योजना, उपक्रम तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधींची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुलोमच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

अमृतच्या योजनांचा जनजागृतीसाठी अनुलोम सरसावले; अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या प्रचाराला वेग मुख्य फोटो
अमृतच्या योजनांचा जनजागृतीसाठी अनुलोम सरसावले; अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या प्रचाराला वेग अतिरिक्त फोटो

लातूर :* महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (*अमृत)च्या वतीने लातूर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या *‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* प्रदर्शनाच्या प्रचार-प्रसारासाठी **अनुलोम सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.* अमृतच्या विविध योजना, उपक्रम तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधींची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुलोमच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

*‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’* हा उपक्रम स्थानिक उद्योजक, महिला, युवक तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच उद्योजकांना आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

अमृतच्या योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावी तसेच *अमृतपेठ थेट बाजारपेठेला अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे*, या उद्देशाने अनुलोमकडून विविध भागांत प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.

या जनजागृती उपक्रमासाठी *अनुलोम मराठवाडा विभाग प्रमुख विद्या पाठक, **लातूर उपविभाग संवादिनी मोहनी सोळंके, **लातूर शहर भाग एक संवादिनी मनिषा कांबळे* आणि *लातूर शहर भाग दोन संवादिनी मीना वाघमारे* यांनी पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमासाठी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर* व *जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी* यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत लातूर जिल्हा कार्यालयामार्फत विविध स्तरांवर जनजागृती व समन्वयाचे कार्य करण्यात येत आहे.

अमृतच्या योजना आणि उपक्रमांचा व्यापक प्रचार होण्यासोबतच *अमृतपेठ थेट बाजारपेठेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा*, यासाठी अनुलोमने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे.


अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर , लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 02:12 PM News publication time | Views: 222 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 02:12 PM News publication time | Views: 222 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement