महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत - AMRUT) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुणे जिल्हा कार्यालयाच्या वतीने ‘अमृत-सेतू संवाद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासन आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये सकारात्मक संवाद व समन्वय वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत - AMRUT) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुणे जिल्हा कार्यालयाच्या वतीने ‘अमृत-सेतू संवाद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासन आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये सकारात्मक संवाद व समन्वय वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या शिरूर तालुक्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘अमृत’ संस्थेच्या वतीने शिरूरचे नायब तहसीलदार मुसळे साहेब यांना नुकतेच एक अधिकृत पत्र देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. शासन व्यवस्था आणि सर्वसामान्य जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, यासाठी महसूल प्रशासनाचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. पत्राचा स्वीकार केल्यानंतर नायब तहसीलदार मुसळे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शिरूर तालुक्यातील नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभाग आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. या उपक्रमामुळे शासकीय योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment