लातूर येथे महेश सहकारी बँकेच्या कर्ज अधिकाऱ्यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट

महेश सहकारी बँक, पुणे – शाखा लातूर येथील कर्ज अधिकारी श्री. रितेश लड्डा व श्री. प्रशांत झुंजारे यांनी लातूर येथील अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांबाबत तसेच उद्योजकांना उपलब्ध होणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

लातूर येथे महेश सहकारी बँकेच्या कर्ज अधिकाऱ्यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट मुख्य फोटो
लातूर येथे महेश सहकारी बँकेच्या कर्ज अधिकाऱ्यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट अतिरिक्त फोटो

*लातूर :* महेश सहकारी बँक, पुणे – शाखा लातूर येथील कर्ज अधिकारी *श्री. रितेश लड्डा* व *श्री. प्रशांत झुंजारे* यांनी लातूर येथील *अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट* दिली. यावेळी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांबाबत तसेच उद्योजकांना उपलब्ध होणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी व अमृत मित्र श्री. अमित पांडे* उपस्थित होते.

भेटीदरम्यान *जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी महेश सहकारी बँकेच्या कर्ज सुविधा, कर्जप्रक्रिया व विविध आर्थिक योजनांची माहिती घेतली. तसेच अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या व्याजपरतावा योजनेबाबत बँकेच्या कर्ज अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.* पात्र लाभार्थी व उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळवून देताना आवश्यक कर्जप्रक्रिया, बँकेची भूमिका आणि परस्पर समन्वयाबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

अमृतच्या माध्यमातून युवक, उद्योजक व लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकिंग संस्थांशी समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महेश सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांची ही भेट *उद्योजकांना कर्ज सुविधा व व्याजपरतावा योजनेचा लाभ सुलभपणे मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.*

यावेळी भविष्यातही *अमृत व महेश सहकारी बँक यांच्या समन्वयातून अधिकाधिक पात्र लाभार्थी व नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा* झाली.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470

पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर

तालुका, जिल्हा लातूर-413512


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 07-09-2026 News publication date | Time: 03:44 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 07-09-2026 News publication date | Time: 03:44 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement