छत्रपती संभाजीनगर येथे अमृत संस्थेतर्फे खुल्या गटातील युवती व महिलांसाठी ८ ते १२ सप्टेंबर २०२६ दरम्यान पाच दिवसीय मोफत ब्युटी वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत होणाऱ्या प्रशिक्षणात सेल्फ मेकअप, ब्रायडल मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग, वॅक्सिंग तसेच ब्युटी टिप्स व मेकअप ट्रिक्स शिकविल्या जाणार आहेत. मर्यादित जागा असून इच्छुक महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने खुल्या गटातील युवती व महिलांसाठी ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पाच दिवसीय मोफत ब्युटी वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे.
सण-समारंभ, गौरी-गणपती, लग्नकार्य किंवा विविध कार्यक्रमांसाठी पार्लरमध्ये जाण्याऐवजी महिलांनी स्वतःचा मेकअप आत्मविश्वासाने करता यावा, तसेच ब्युटी क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये Self Makeup, Bridal Makeup, Hairstyle, Saree Draping, Waxing तसेच Beauty Tips व Makeup Tricks यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. पाच दिवसांचे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून सहभागी महिलांना स्वतःचा मेकअप करण्यासोबतच ब्युटी क्षेत्रात पुढे व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी उपयुक्त कौशल्ये शिकता येणार आहेत.
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, हिंदू वीरशैव लिंगायत, अग्रवाल, गुजराती, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार आदी समाजांचा सद्यस्थितीत समावेश आहे.अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेची टीसी, तहसीलदार यांच्या सेतू सुविधा केंद्रातून काढलेले उत्पन्न प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी/डोमिसाईल प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच नावात बदल असल्यास गॅझेट आवश्यक आहे.
संपर्क व नोंदणी विभागीय व जिल्हा कार्यालय – अमृत पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमान नगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९ संपर्क : ९४०४५९३७२६ / ७७०९०८००७३ प्रशिक्षण कालावधी : ८ ते १२ सप्टेंबर २०२६ वेळ : दुपारी २ ते ५ प्रशिक्षण शुल्क : पूर्णपणे मोफत
मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुक युवती व महिलांनी आजच नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment