सोलापूरमध्ये ‘अमृत’तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन!

सोलापूरमध्ये ‘अमृत’तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूरमध्ये ‘अमृत’तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन! मुख्य फोटो
सोलापूरमध्ये ‘अमृत’तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन! अतिरिक्त फोटो

सोलापूर: महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (AMRUT), सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने नवउद्योजक आणि तरुणांसाठी मोफत 'उद्योजकता विकास कार्यक्रम' (EDP Course) आयोजित करण्यात आला आहे.

​हे प्रशिक्षण ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते ८:३० या वेळेत होणार आहे.

या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन पुरवले जाणार आहे.

प्रशिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये:

​नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आवश्यक मार्गदर्शन.

​क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांकडून मोफत प्रशिक्षण.

​ब्रँडिंग, मार्केटिंग, आर्थिक नियोजन व व्यवसाय वाढीचे धडे.

​यशस्वी उद्योजक बनण्यासाठी योग्य व्यासपीठ व संधी.


पत्ता: ​१०८ A, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतीराज हॉटेलच्या पुढे, सात रस्ता, मोदीखाना, सोलापूर - ४१३००१.

​संपर्क क्रमांक: ९११२२२८७६८


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/







Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 07-09-2026 News publication date | Time: 12:35 PM News publication time | Views: 91 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 07-09-2026 News publication date | Time: 12:35 PM News publication time | Views: 91 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement