अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पालघर जिल्हा शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणी पूर्णिमा (किंवा इच्छित तिथी) चे औचित्य साधून सामूहिक यज्ञोपवीत (जानवे बदल) शास्त्रोक्त पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या मंगलमय सोहळ्याला पालघर जिल्ह्यातील तसेच परिसरातील विप्र समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,पालघर आयोजित यदनोपवीत बदलचा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. २१ ब्राह्मवृंदानी भाग घेऊन कार्यक्रम चांगला झाला.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ चे अध्यक्ष श्री दिनेश पाठक व महाराष्ट्र राज्य चे सचिव श्री जयप्रकाश मार्तंड बाबा जोशी कार्याध्यक्ष निवृत्ती जोशी पालघर जिल्हा तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अध्यक्ष सौ कोमल कितेश जोशी पालघर यांच्या सौजन्याने श्रावणी नागेश्वर शंकर मंदिर येथे पार पडले .
पालघर जिल्हा अमृत संथेच्या वतीने श्री .अमित उदय आठवले - जिल्हा व्यवस्थपाक विशेष उपस्थित होते.
सनातन संस्कृतीतील संस्कारांचे जतन करण्याच्या उद्देशाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.विधी व मंत्रोच्चार: उपस्थित पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने, मंत्रोच्चारात जुने यज्ञोपवीत विसर्जित करून नवीन यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी पूर्ण करण्यात आला.उद्देश: नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व संस्कारांची ओळख व्हावी आणि समाजात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला गेला होता . या धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित समाजाला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'अमृत' या शासकीय संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आणि लोकांनी अमृतच्या विविध योजनांचे कौतुक केले. मान्यवरांनी अमृतच्या उपक्रमास जमेल तसे साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
अधिक महितीसाठी संपर्क : अमृत पालघर अमित उदय आठवले 9112226530
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment