अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुका येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाची सुरुवात

अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुका येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे.तालुका ठिकाणी प्रशिक्षण मिळत असल्याने लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुका येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाची सुरुवात मुख्य फोटो
अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुका येथील "उद्योजकता विकास कार्यक्रम" प्रशिक्षणाची सुरुवात अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर :-श्रीगोंदा येथे "उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाची" सुरुवात झाली असून,श्रीगोंदा येथील ब्राह्मण युवक संघ अध्यक्ष श्री संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते या 10 दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.

प्रशिक्षणाची सुरुवात भारत माता प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस होता. उदघाटना नंतर श्री प्रसाद टकले यांनी प्रस्ताविक केले. राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे.

प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजना,"अमृत पेठ – बाजारपेठ" व ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सविस्तर माहीती दिली.त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र मधील काही योजना माहिती दिली. प्रशिक्षण घेण्यासाठी "डाटा बाईट कॉम्प्युटर्स"चे संचालक मा दिपक काळे सर यांचे सहकार्य लाभले.प्रशिक्षण मध्ये एकूण 17 लाभार्थी यांनी रजिस्ट्रेशन करून सहभाग घेतला आहे.

ब्राह्मण युवक संघ अध्यक्ष श्री संदीप कुलकर्णी यांनी शेवटी आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 05-09-2026 News publication date | Time: 08:51 PM News publication time | Views: 109 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 05-09-2026 News publication date | Time: 08:51 PM News publication time | Views: 109 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement