लातूरमध्ये अमृतच्या EDP प्रशिक्षण बॅचला उत्साहात सुरुवात उद्योजकतेच्या संधी, व्यवसाय नियोजन व शासकीय योजनांबाबत मिळणार मार्गदर्शन.

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या स्वायत्त संस्थेच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत (EDP) प्रशिक्षणाच्या नवीन बॅचला आज, दि. ५ सप्टेंबर रोजी लातूर येथे सुरुवात झाली. हे प्रशिक्षण ५ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

लातूरमध्ये अमृतच्या EDP प्रशिक्षण बॅचला उत्साहात सुरुवात उद्योजकतेच्या संधी, व्यवसाय नियोजन व शासकीय योजनांबाबत मिळणार मार्गदर्शन. मुख्य फोटो
लातूरमध्ये अमृतच्या EDP प्रशिक्षण बॅचला उत्साहात सुरुवात उद्योजकतेच्या संधी, व्यवसाय नियोजन व शासकीय योजनांबाबत मिळणार मार्गदर्शन. अतिरिक्त फोटो

लातूर, दि. ५ सप्टेंबर :* अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या स्वायत्त संस्थेच्या वतीने *उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत (EDP)* प्रशिक्षणाच्या नवीन बॅचला आज, दि. ५ सप्टेंबर रोजी लातूर येथे सुरुवात झाली. हे प्रशिक्षण *५ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६* या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये *४ दिवस ऑफलाईन तर ६ दिवस ऑनलाईन* पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान उद्योजकतेच्या विविध संधी, व्यवसायाची निवड व नियोजन, उद्योग सुरू करण्याच्या पद्धती, आर्थिक नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, व्यवसाय व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*प्रशिक्षक श्री. शामसुंदर सर* यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये, व्यवसायाची योग्य आखणी आणि प्रत्यक्ष व्यवसाय करताना येणाऱ्या विविध बाबींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.

नवीन उद्योग सुरू करू इच्छिणारे युवक-युवती तसेच आपल्या विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना *स्वावलंबी व सक्षम उद्योजक होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मार्गदर्शन* मिळणार असून, त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

यावेळी *अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी, अमृत मित्र श्री. अमित पांडे* यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक युवक-युवतींना उद्योजकतेच्या प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा अमृतचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती, नवउद्योजक तसेच व्यवसाय विस्तार करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी *अमृतच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा*, असे आवाहन करण्यात आले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर

अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470

पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 05-09-2026 News publication date | Time: 05:22 PM News publication time | Views: 170 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 05-09-2026 News publication date | Time: 05:22 PM News publication time | Views: 170 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement