नायगाव येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित १० दिवसीय 'उद्योग कौशल्य वर्धन' प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप

नायगाव येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित १० दिवसीय 'उद्योग कौशल्य वर्धन' प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप

नायगाव येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित १० दिवसीय 'उद्योग कौशल्य वर्धन' प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप मुख्य फोटो
मुख्य फोटो

नायगाव येथे अमृत संस्थेतर्फे आयोजित १० दिवसीय 'उद्योग कौशल्य वर्धन' प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप नायगाव (जि. नांदेड):

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) अमृत संस्थेच्या वतीने आयोजित १० दिवसीय 'उद्योग कौशल्य वर्धन' (EDP) प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज दिनांक ०५/०९/२०२६ रोजी अत्यंत उत्साहात समारोप झाला. या दहा दिवसांच्या कालावधीत नवउद्योजकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधींची माहिती देऊन त्यांचे व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी युवा उद्योजक श्री. आशिष सासट्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. "डिजिटल मार्केटिंग आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) साधनांचा वापर करून उद्योग कसा वाढवावा" या विषयावर त्यांनी सविस्तर आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायाचे जाळे कसे विस्तारता येते, याबद्दल त्यांनी दिलेल्या सोप्या टिप्स प्रशिक्षणार्थींसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या.

कार्यक्रमादरम्यान अमृत नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर यांनी अमृत संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना, आर्थिक साहाय्य आणि नवउद्योजकांसाठी असणाऱ्या संधींची सविस्तर माहिती दिली.

या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि नियोजनाची धुरा अमृत नांदेडचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. मान्यवरांचे मोलाचे सहकार्य या १० दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय आय.टी.आय. नायगावचे प्राचार्य श्री. पांडुरंग अन्नपुर्णे, व्यवस्थापन समिती सदस्य श्री. सदानंद चुटेवाट, श्री. लक्ष्मण बुद्धलवाड, गटनिदेशक श्री. साईनाथ तोडकर यांच्यासह सर्व विषय निदेशक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. "या दहा दिवसांच्या प्रशिक्षणामुळे उद्योग कसा सुरू करावा, त्याचे व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व याबद्दल अत्यंत मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन मिळाले," असा विश्वास सर्व प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 05-09-2026 News publication date | Time: 04:05 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 05-09-2026 News publication date | Time: 04:05 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement