मनमाड येथे अमृतच्या EDP प्रशिक्षणाची बॅच ६ सप्टेंबरपासून

अमृत या स्वायत्त संस्थेच्या वतीने स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी *उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Programme – EDP)* कार्यक्रमाची नवीन १० दिवसांची प्रशिक्षण बॅच *६ सप्टेंबर २०२६ पासून* सुरू होणार आहे.

मनमाड येथे अमृतच्या EDP प्रशिक्षणाची बॅच ६ सप्टेंबरपासून मुख्य फोटो
मुख्य फोटो

मनमाड:- अमृत संस्थेच्या वतीने युवक-युवती व इच्छुक उद्योजकांसाठी १० दिवसांचे मोफत अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, चालू व्यवसायाचा विस्तार, विक्री व नफा वाढविण्याचे तंत्र, ग्राहकसंख्या वाढविण्याच्या प्रभावी युक्त्या तसेच डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. व्यवसायातील विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचीही माहिती देण्यात येणार आहे.

ऑफलाईन प्रशिक्षणाचे ठिकाण :- श्री बालाजी मंदिर आठवडे बाजार जि. नासिक मनमाड येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क:- दिपक गुप्ता:- 9423476929 / संजय गोसावी :-8857073911 /अजिंक्य कन्नल:-9665692676 /नासिक ऑफिस :-9112228770 सर्व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी,भूमिहार,हिंदू वीरशैव लिंगायत, अग्रवाल अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Ajinkya Kannal News publisher name | Date: 04-09-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 328 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Ajinkya Kannal News publisher name | Date: 04-09-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 328 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement