“कौशल्यातून आत्मनिर्भरतेकडे; चंद्रपूर जिल्ह्यात ‘अमृत’ बेकरी प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ”

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व वरोरा येथे अमृत बेकरी प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

“कौशल्यातून आत्मनिर्भरतेकडे; चंद्रपूर जिल्ह्यात ‘अमृत’ बेकरी प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ” मुख्य फोटो
“कौशल्यातून आत्मनिर्भरतेकडे; चंद्रपूर जिल्ह्यात ‘अमृत’ बेकरी प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ” अतिरिक्त फोटो

चंद्रपूर शहरातील काळाराम मंदिर हॉल येथे अमृत बेकरी प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, बेकरी व्यवसायातील विविध पदार्थ निर्मिती, आवश्यक कौशल्ये तसेच व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच वरोरा येथील राम मंदिर हॉलमध्ये आयोजित उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. मनोजजी रेलकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वरोरा नगर संघचालक) तसेच प्रमुख उद्घाटक म्हणून मा. सुनीलजी सरोदे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वरोरा खंड संघचालक) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना कौशल्याधारित प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. बेकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना विविध बेकरी पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक व कौशल्याधारित प्रशिक्षण मिळणार असून, त्यातून रोजगारासोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे.

“कौशल्यातून आत्मनिर्भरतेकडे” या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण उपक्रमातून युवक व नागरिकांना कौशल्यविकासासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा व्यवस्थापक विक्रममोहन पांडे , आदित्य सेंगर , अमृत मित्र सतीश नारायणदास व अमृत सखी वैष्णवी दारव्हेकर उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 09:51 PM News publication time | Views: 184 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 09:51 PM News publication time | Views: 184 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement