श्रीकृष्णाच्या गोष्टीपासून पारंपरिक खेळांपर्यंत, अमृत वर्गात विद्यार्थ्यांची धमाल

प्रार्थना, गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्णाची गोष्ट, गाणी,फुलांची व फळांची माहिती , तसेच बौद्धिक व बैठे खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘मामाचे पत्र हरवले’ या पारंपरिक खेळात उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपक्रमाचे शाळेतील शिक्षक व पालकांनी कौतुक केले. हा अमृत वर्ग अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी घेतला.

श्रीकृष्णाच्या गोष्टीपासून पारंपरिक खेळांपर्यंत, अमृत वर्गात विद्यार्थ्यांची धमाल मुख्य फोटो
श्रीकृष्णाच्या गोष्टीपासून पारंपरिक खेळांपर्यंत, अमृत वर्गात विद्यार्थ्यांची धमाल अतिरिक्त फोटो

रायझिंग स्टार स्कूल छ. संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत वर्गाचे आयोजन करण्यात येते . या उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना, गोकुळ अष्टमी निमित्त श्रीकृष्णा ची गोष्ट , गोष्ट,गाणी , फुले व फळांची माहिती तसेच विविध बौद्धिक आणि बैठे खेळ घेण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीतील जुन्या खेळांची ओळख करून देत ‘मामाचे पत्र हरवले’ हा पारंपरिक बैठे खेळ घेण्यात आला. विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. खेळ व मनोरंजक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्यात एकाग्रता, विचारशक्ती, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अमृत वर्गातील विविध उपक्रमांचे शाळेतील शिक्षक तसेच पालकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अमृत वर्गाचे वातावरण आनंदमय झाले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



हा अमृत वर्ग अमृत सखी सौ. मंजू कुलकर्णी यांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 11:57 AM News publication time | Views: 106 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 03-09-2026 News publication date | Time: 11:57 AM News publication time | Views: 106 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement