भक्ती, संस्कार आणि महिला एकजुटीचा सुंदर संगम अशा वातावरणात अमृत योजनांचा प्रचार/ प्रसार हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ब्राह्मण संघर्ष समिती मुख्य समन्वयक आणि शिवसेना उपजिल्हा संघटक मुरबाड विधानसभा सौ अर्चना विशाल सरुडकर आणि मनस्वी ब्राह्मण महिला मंच यांनी आज संकष्टी चतुर्थी व श्रावण सोमवारच्या निमित्ताने महिला भगिनींच्या उपस्थितीत श्री गणपती अथर्वशीर्षाचे सामूहिक आवर्तन कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी उपस्थित महिलांनी श्रद्धा व भक्तिभावाने अथर्वशीर्षाचे आवर्तन करून श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले. त्या नंतर अमृत योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी महिला सक्षमिकरण, कौशल्य विकास , उद्योजकता विकास आणि विविध प्रशिक्षण उपक्रम तसेच आर्थिक सहाय्याच्या योजनांबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले . महिलांनी योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. पात्र लाभार्थींनी अमृतच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
भक्ती, संस्कार आणि महिला एकजुटीचा सुंदर संगम अशा वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तेथे अमृत योजनांची माहिती देण्यात आली. तसेच बेकरी प्रशिक्षण आणि EDP साठी त्या तयार आहेत. डॉक्युमेंट प्रोसेस करण्यासाठी सांगितले आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment