कवठे यमाई:येथील गणेश नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकतेच 'अमृत वर्गाचे' अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
कवठे यमाई:येथील गणेश नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकतेच 'अमृत वर्गाचे' अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या नाविन्यपूर्ण वर्गामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जोश आणि आनंद पाहायला मिळाला.या अमृत वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे संस्कार गीत, बौद्धिक खेळ आणि मैदानी खेळ शिकवण्यात आले.
मनोरंजनातून शिक्षणाचा हा पॅटर्न विद्यार्थ्यांना खूप भावला. खेळांसोबतच विद्यार्थ्यांनी दिलेल्या गगनभेदी देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण शाळा परिसर देशप्रेमाने भारावून गेला होता.
या सर्व उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्यात नवा उत्साह संचारला आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका/शिक्षिका पुष्पा शिंदे यांनी या संपूर्ण उपक्रमाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले.
"अशा प्रकारच्या वर्गांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला मोठी मदत होते. हा अमृत वर्ग आमच्या शाळेत नेहमी घेण्यात यावा," अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
या प्रसंगी शिंदे मॅडम यांना अमृत वर्गाच्या अभ्यासक्रमा संदर्भातील पीडीएफ (PDF) पुस्तिकाही सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप अत्यंत आनंदात झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment