महाराष्ट्र शासनाने लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा **महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)**च्या योजनांमध्ये समावेश केल्यानंतर आडस (ता. धारूर) येथील मोरया कॉम्प्युटर वर्ल्ड येथे लिंगायत समाजाच्या वतीने अमृतच्या विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमृत, बीडचे जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी यांनी उपस्थित समाजबांधवांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
आडस,बीड : महाराष्ट्र शासनाने लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा **महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)**च्या योजनांमध्ये समावेश केल्यानंतर आडस (ता. धारूर) येथील मोरया कॉम्प्युटर वर्ल्ड येथे लिंगायत समाजाच्या वतीने अमृतच्या विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमृत, बीडचे जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी यांनी उपस्थित समाजबांधवांना विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, राज्यातील पात्र समाजघटकांतील विद्यार्थी, युवक, महिला, बेरोजगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार तसेच नवउद्योजक आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार-उद्योजकतेच्या माध्यमातून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविते.
यावेळी दिगंबर जोशी यांनी अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, विविध शैक्षणिक व प्रशिक्षणपर अर्थसहाय्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाशी संबंधित योजनांची माहिती दिली. लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा योजनांमध्ये समावेश झाल्यामुळे पात्र विद्यार्थी, युवक, महिला व नवउद्योजकांना या योजनांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण व अर्थसहाय्य, कौशल्याधारित प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध प्रकारचे सहाय्य मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
समाजातील पात्र लाभार्थ्यांनी योजनांची माहिती घेऊन शैक्षणिक प्रगती, रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन दिगंबर जोशी यांनी केले. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीला आडससह परिसरातील पंचक्रोशीतील लिंगायत समाजबांधवांची उपस्थिती होती. उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. समाजातील अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत अमृतच्या योजनांची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment