लातूर येथील प्रसिद्ध उद्योजक *सौरभ ताथोडे* यांची भेट घेऊन *अमृत पेठ* तसेच अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
लातूर :* लातूर येथील प्रसिद्ध उद्योजक *सौरभ ताथोडे* यांची भेट घेऊन *अमृत पेठ* तसेच अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. *अमृत मित्र अमित पांडे* यांनी सौरभ ताथोडे यांची भेट घेऊन अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि समाजातील पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. तसेच अमृत पेठच्या माध्यमातून योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृती उपक्रमाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक *श्री. शुभम मुळजकर* यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतच्या विविध योजनांची माहिती समाजातील घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत सौरभ ताथोडे यांची भेट घेऊन योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ताथोडे यांनी अमृतच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली आणि समाजातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर , लातूर
तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
vivek wavare
It is very Good scheme for the youth, but it requires to reach to all youth business person, who may take benifit of the scheme.
Rajkumar biradar
Great
Write a Comment