अहिल्यानगरच्या अमृत कार्यालयाने केले संपर्क साधण्याचे आवाहन
अहिल्यानगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. ज्या जातींना अन्य कोणत्याही स्वतंत्र शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा अमृत लक्ष्यित समाजातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही मिळते. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अहिल्यानगरच्या अमृत कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे. काही योजनांची माहिती येथे दिली आहे.
- अमृत कौशल्य उद्यम योजनेअंतर्गत आपल्याला आवड असलेल्या उद्योगाचे प्रशिक्षण मोफत मिळणार.
- सी-डॅकसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेत कोर्सेस मोफत करता येतात.
- शासकीय टंकलेखन, लघुलेखन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी परत मिळते.
- एमपीएससी/यूपीएससी पूर्वपरीक्षा पास झाला आहात? पुढील तयारीसाठी, मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी अर्थसाह्य मिळू शकेल.
- AIIMS,IIT ,IIM, IIIT अशा नामांकित संस्थेत प्रवेश घ्यायची इच्छा आहे; पण आर्थिक पाठबळ नसेल, तर अमृत संस्थेकडून अर्थसाह्य मिळते.
- NIELIT, CIPET, IGTR संस्थांच्या ठरावीक कोर्सची पूर्ण फी आता अमृत संस्थेकडून मिळते.
- आपल्या व्यावसायिक बंधूंना आता हक्काचे व्यासपीठ असलेल्या अमृतपेठ प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करता येणार.
- १५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यावसायिक कर्जावरील व्याजपरतावा मिळतो.
कार्यालय पत्ता : अमृत संस्थेचे अहिल्यानगर कार्यालय,
वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment