टंकलेखन-लघुलेखन योजनेचा लाभ मिळालेल्या सृष्टी डांगेचे आवाहन
अहिल्यानगर : अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या टंकलेखन व लघुलेखन योजनेचा (जीसीसी-टीबीसी) लाभ मिळालेल्या सृष्टी डांगे या विद्यार्थिनीने अमृत संस्थेचे आभार मानले आहेत. हा कोर्स यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर तिला ‘अमृत’तर्फे संपूर्ण फीचा परतावा मिळाला आहे. या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल सृष्टी डांगे हिने अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले. लक्ष्यित गटातील युवक व युवती यांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सृष्टीने केले. ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपर्यंत अमृत संस्थेच्या योजना पोहोचवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आवाहन भोपे यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
कार्यालय पत्ता : अमृत संस्थेचे अहिल्यानगर कार्यालय,
वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment