अमृतच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात उद्योजकतेला नवी दिशा; विविध EDP प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment And Training) संस्थेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लक्षित गटातील युवक-युवती, महिला व इच्छुक लाभार्थ्यांसाठी विविध उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) सुरू करण्यात येत आहेत.

अमृतच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात उद्योजकतेला नवी दिशा; विविध EDP प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृतच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात उद्योजकतेला नवी दिशा; विविध EDP प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment And Training) संस्थेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लक्षित गटातील युवक-युवती, महिला व इच्छुक लाभार्थ्यांसाठी विविध उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) सुरू करण्यात येत आहेत.

स्वरोजगार व उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणामध्ये केवळ व्यवसायाचे प्रशिक्षण न देता व्यवसाय सुरू करण्यापासून तो यशस्वीपणे उभा करण्यापर्यंत आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणांतर्गत पॅकेजिंग व लेबलिंग, दुग्ध व्यवसाय, विविध व्यवसाय नियोजन, मार्केटिंग, व्यवसाय नोंदणी, बँक कर्ज प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना व्यवसायासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान, नियोजन कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

- व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन - व्यवसाय नियोजन व व्यवस्थापनाचे व्यावहारिक प्रशिक्षण - पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंगचे मार्गदर्शन - शासकीय योजना व अनुदान/सबसिडीबाबत माहिती - बँक कर्ज व कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन - अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन - स्वयंरोजगार व स्वावलंबनासाठी आवश्यक कौशल्यविकास “स्वरोजगाराकडे वाटचाल करा, अमृतसोबत प्रगती साधा!” या उद्देशाने जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृतच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक, महिला व इच्छुक लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी योग्य दिशा, प्रशिक्षण आणि शासनाच्या उपलब्ध संधींची माहिती मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. जिग्नेश कमानी जिल्हा व्यवस्थापक, अमृत 📞 9112227637

अमृत जिल्हा कार्यालय, बुलढाणा 305, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालय समोर, बुलढाणा.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:04 PM News publication time | Views: 2,015 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 27-08-2026 News publication date | Time: 12:04 PM News publication time | Views: 2,015 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

M
Madhav Subhash Shimbre
29-08-2026 04:11 PM

दूध व्यवसायासाठी Bank लोन देत नाही साहेब

Write a Comment
0 / 50 words
Advertisement