छत्रपती संभाजीनगरमधील ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणाला अमृत संस्थेच्या राज्य व्यवस्थापकांची भेट
छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये अॅडव्हान्स ब्युटी पार्लर या विषयावर महिन्याभराचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, छत्रपती संभाजीनगर विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृतमित्र रामेश्वर साळुंखे यांनी भेट दिली. या वेळी दीपक जोशी यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देऊन व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षणार्थींना सांगितल्या. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आत्मविश्वास मिळत असून, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर क्षेत्रातील नोकरीच्या संधी, स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा, उद्योजकीय कौशल्ये, ग्राहक कसे वाढवायचे, बाजारपेठेचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. तसेच अमृत संस्थेच्या विविध योजना, कर्जविषयक माहिती आणि इतर शासकीय योजनांची माहितीही प्रशिक्षणार्थींना दिली जात आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम २४ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, सुदर्शननगर (एन-११, हडको) येथील ड्रीम्स ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटरच्या संस्थापक संचालिका वनिता शिंदे या प्रशिक्षण देत आहेत.
संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment