अकोल्यात अमृत संस्थेमार्फत लवकरच ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम

आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या उपक्रमाची महिलांना देण्यात आली माहिती

अकोल्यात अमृत संस्थेमार्फत लवकरच ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम मुख्य फोटो
अकोल्यात अमृत संस्थेमार्फत लवकरच ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम अतिरिक्त फोटो

अकोला : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत अकोला येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम राबवला जाणार आहे. त्या प्रशिक्षण उपक्रमाची माहिती देणारा ओरिएंटेशन कार्यक्रम अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात उत्साहात पार पडला. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांना आगामी प्रशिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण उपक्रमात ब्रायडल मेकअप, बेसिक पार्लर ट्रेनिंग, फेशियल, क्लीन-अप, थ्रेडिंग, वॅक्सिंग, हेअर स्टायलिंग, स्किन केअर, तसेच सौंदर्य व्यवसायाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायातील मूलभूत ते व्यावसायिक पातळीवरील कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. ओरिएंटेशन कार्यक्रमात प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाची रचना, प्रत्यक्ष प्रशिक्षण पद्धती, तसेच प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांना स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक भांडवल, ग्राहक व्यवस्थापन, स्वच्छता, दर्जेदार सेवा व उत्पन्नवाढीच्या संधी यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याच्या विविध भागांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणामुळे रोजगाराची नवी दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले. अनेक महिलांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. अशा प्रकारच्या कौशल्यविकास प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. अकोला जिल्ह्यातील महिलांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून, भविष्यातही या आणि अशा अन्य विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 05:39 PM News publication time | Views: 324 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 05:39 PM News publication time | Views: 324 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words