इतिहासातून प्रेरणा, पराक्रमातून राष्ट्रभक्ती — डोरलेवाडीत बारामती विशेष व्याख्यान
अमृत संस्थेच्या वतीने संत तुकाराम महाराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, डोरलेवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. इतिहासतज्ज्ञ मा. जगन्नाथ लडकत सर यांनी विद्यार्थ्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी इतिहास सांगितला.
बाजीराव पेशव्यांची युद्धनीती, धाडसी निर्णयक्षमता, वेगवान मोहिमा आणि दूरदृष्टी यांची माहिती देत विद्यार्थ्यांनी इतिहासातून धैर्य, शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमाचे गुण आत्मसात करावेत, असे आवाहन लडकत सरांनी केले.
यावेळी अमृत संस्थेचे सातारा जिल्हा उपव्यवस्थापक श्री. अविनाश कुलकर्णी, संस्थापक श्री. महादेव काळे, मुख्याध्यापिका सौ. सुषमा काळे, वेदमूर्ती शशांक आर्निकर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमान घडवण्याचा संदेश देणारे हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment