अकोले तालुक्यातील "हिंद सेवा मंडळाचे" मॉडर्न हायस्कूल चे उपमुख्याध्यापक मा सुधीर जोशी सर यांची जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी भेट घेतली.
अहिल्यानगर मधील अकोले तालुक्यातील "हिंद सेवा मंडळाचे" मॉडर्न हायस्कूल चे उपमुख्याध्यापक मा सुधीर जोशी सर यांची जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी भेट घेतली.
अमृत पराक्रम दिन निमित्त आयोजित विविध स्पर्धा मध्ये विद्यार्थी यांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अमृत संस्थेच्या सर्व योजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.व त्यांच्या ३० वर्षाच्या कालखंडात शिक्षण क्षेत्रातील कार्यात प्रथमच हे पहिले की,श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याविषयी महाराष्ट्रभर कोणीतरी स्पर्धा,व्याख्यान घेत आहे.
अमृत संस्थेच्या या कार्याबद्दल आश्चर्य वाटले आणि समाधान व्यक्त केले.
अमृत वर्ग ही नियमित चालू करण्याचा त्यांचा मानस आहे.
अमृत संस्थेच्या योजना अमृत संस्थेच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment