लातूर येथील नगरसेविका प्रेरणा उमाकांत होनराव यांची सदिच्छा भेट अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची दिली माहिती; नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याबाबत सकारात्मक चर्चा

लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रेरणा उमाकांत होनराव यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)*च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

लातूर येथील नगरसेविका प्रेरणा उमाकांत होनराव यांची सदिच्छा भेट अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची दिली माहिती; नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर, दि. २५ : लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रेरणा उमाकांत होनराव यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)*च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी अमृतच्या माध्यमातून युवक, महिला, नवउद्योजक तसेच विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अमृतच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी विविध प्रशिक्षण उपक्रम, स्वयंरोजगाराच्या योजना, उद्योजकता विकास तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घ्यावा, याबाबतही चर्चा करण्यात आली.

लातूर शहरातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना व अमृतच्या उपक्रमांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. समाजातील गरजू व इच्छुक युवक, महिला आणि नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होऊ शकते, याबाबतही सकारात्मक विचारविनिमय झाला.

अमृतच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, यासाठी जनजागृती करण्याबरोबरच प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा झाली.

या सदिच्छा भेटीत नगरसेविका प्रेरणा उमाकांत होनराव यांनी अमृतच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. भेटीदरम्यान शहरातील युवक व महिलांना उपलब्ध असलेल्या संधींबाबतही चर्चा करण्यात आली.


अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर

जिल्हा व्यवस्थापक,लातूर

अमृत कार्यालय,लातूर

संपर्क क्रमांक- 7391065470

पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग,

मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,

लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.



संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 02:23 PM News publication time | Views: 9 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: चिंतेश जोशी News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 02:23 PM News publication time | Views: 9 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement