अमृतपेठ थेट बाजारपेठेला मालेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालेगाव येथे दि. २२, २३ व २४ ऑगस्ट असे तीन दिवसीय अमृतपेठ थेट बाजारपेठचे आयोजन करण्यात आले होते. अमृतपेठ थेट बाजारपेठ ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

अमृतपेठ थेट बाजारपेठेला मालेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुख्य फोटो
अमृतपेठ थेट बाजारपेठेला मालेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अतिरिक्त फोटो

मालेगाव: मालेगाव कॅम्प येथील बालगंधर्व नाट्यगृह, सोमवार बाजार येथे अमृतपेठ थेट बाजारपेठेचे २२, २३ व २४ ऑगस्ट असे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बाजारपेठेला मालेगावकरांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बाजारपेठेत विविध खाद्यपदार्थांसह महिलांसाठी फॅशनेबल चपला, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, ड्रेस मटेरियल, विविध प्रकारच्या राख्या तसेच इतर वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध होते. कॅम्प परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने भेट देत खरेदीचा आनंद घेतला.

या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल अमृतचे जिल्हा प्रमुख दिपक गुप्ता यांनी मालेगावकर नागरिक, महिला भगिनी, स्टॉलधारक यांचे आभार मानले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 12:06 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 12:06 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement