पालघर येथील विरार हितवर्धक ब्राह्मण सभेच्या बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती

विरार हितवर्धक ब्राह्मण सभेच्या आयोजित बैठकीत उपस्थित सदस्यांना अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. . खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी 'अमृत' संस्थेच्या योजना वरदान; विविध उपक्रमांची माहिती, नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पालघर येथील विरार हितवर्धक ब्राह्मण सभेच्या बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती मुख्य फोटो
पालघर येथील विरार हितवर्धक ब्राह्मण सभेच्या बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती अतिरिक्त फोटो

२३ /०८/२०२६ रोजी विरार धीमही हॉल येथे विरार हितवर्धक ब्राम्हण सभा आयोजित बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली . यावेळी योजनांचा उद्देश, पात्रता, लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी या योजनांविषयी उत्सुकता दर्शवून अधिक माहिती जाणून घेतली. सदर बैठकीमुळे समाजातील पात्र नागरिकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजनांची माहिती पोहोचविण्यास मदत झाली. एकूण ७० सभासद त्यावेळी उपस्थित होते .अमृत' संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा व मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. याद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा सहाय्य कौशल्य विकास, आणि व्यवसाय वाढीसाठी सहाय्य मिळवून देणाऱ्या योजनांची माहिती दिली .बैठकीत श्री .राजेश पवार जिल्हा व्यवस्थापक मुंबई बैठकीचे प्रतिनिधित्व केले. सयोजन सौ. मनाली बेडेकर... सचिव विरार ब्राम्हण सभा विरार . यांनी केले ब्राह्मण हितवर्धक मंडळ, विरार

कार्यकारिणी 2024 ते 2027 1) श्री. संजय अभ्यंकर...अध्यक्ष 2) सौ. जुईली मराठे... उपाध्यक्ष 3) श्री. दीपक करमरकर... खजिनदार 4) श्री. राहुल कुलकर्णी... सह खजिनदार 5) सौ. मनाली बेडेकर... सचिव 6) श्री. अक्षय सोमण...सहसचिव 7) श्री. संजय टिळक... सदस्य 8) सौ. स्नेहल आपटे...सदस्य 9) श्री. श्रीरंग खेर... सदस्य 10) सौ.मनाली सहस्रबुद्धे..सदस्य 11) सौ. अनुजा मेहेंदळे .. सदस्य 12) सौ. अनुश्री मोडक ... सदस्य बैठकीत विविध मार्गाने सहकार्य केले .


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार ,हिंदू वीरर्शैव लिंगायत ,अग्रवाल अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


अधिक महितीसाठी संपर्क : अमित उदय आठवले जिल्हा उपव्यवस्थापक


पालघर ९११२२२६५३०/9975117807

Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 24-08-2026 News publication date | Time: 08:21 PM News publication time | Views: 7 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 24-08-2026 News publication date | Time: 08:21 PM News publication time | Views: 7 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement