लातूर येथील सुप्रसिद्ध ममता हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मायाताई कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)*च्या विविध उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लातूर, दि. २४ : लातूर येथील सुप्रसिद्ध ममता हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मायाताई कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)*च्या विविध उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीस अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर उपस्थित होते. त्यांनी अमृतच्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी अमृतच्या विविध योजनांची तसेच प्रशिक्षणानंतर लाभार्थींना व्यवसाय उभारणीसाठी मिळणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती दिली.
यावेळी डॉ. जोशी साहेब यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सोलार ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधी आणि या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण उपक्रमांबाबत चर्चा झाली.सोलार प्रशिक्षणार्थी वसंत कुलकर्णी यांनी प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून सोलार क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीबाबत माहिती दिली. प्रशिक्षणामुळे तांत्रिक ज्ञानासोबतच स्वयंरोजगारासाठी आवश्यक आत्मविश्वास मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अमृत मित्र अमित पांडे यांनी अमृतच्या उपक्रमांची माहिती देत युवकांनी कौशल्याधारित प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराकडे वळावे, असे सांगितले. डॉ. मायाताई कुलकर्णी यांनी अमृतच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत कौशल्य विकास व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि बदलत्या रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान कौशल्य विकास, सोलार ऊर्जा, उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. ही भेट अमृतच्या उपक्रमांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment