'बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आधार देणारी संस्था म्हणजे अमृत'

औसा येथे कान्यकुब्ज समाजाच्या बैठकीत देण्यात आली योजनांची माहिती

'बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आधार देणारी संस्था म्हणजे अमृत' मुख्य फोटो
'बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आधार देणारी संस्था म्हणजे अमृत' अतिरिक्त फोटो

औसा : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लातूर जिल्ह्यातील औसा येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. ही तालुकास्तरीय बैठक कान्यकुब्ज समाजातील महिला, पुरुष आणि तरुण उद्योजक यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यात अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

राजपूत समाजातील अनेक जण आजही शासकीय योजनांच्या प्रवाहात नसल्याने त्यापासून वंचित असून, अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर अमृत संस्थेच्या योजना उपयुक्त असून, त्या संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील तळागाळातील व्यक्तींना मदत केली जाते, असे प्रतिपादन कान्यकुब्ज समाजाचे अध्यक्ष विवेक मिश्रा यांनी केले. अमृत संस्था ही गरजूंसाठी अमृतासमान असून, ती बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करत आहे, असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार मिश्रा यांनी काढले.

अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील लक्ष्यित गटातील घटकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी दिली. या वेळी उद्योजक श्रीधर ढगे, अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक विनोद अपसिंगेकर, कान्यकुब्ज समाजाचे अध्यक्ष विवेक मिश्रा, अनेक उद्योजिका, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संजय बाजपाई यांनी केले.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 292 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words