सोलापुरातील टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाला 'अमृत पर्यटन'चा मोठा हातभार; ग्राहकांचा तुफान प्रतिसाद!
सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या उपक्रमांमुळे स्थानिक व्यावसायिकांना आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळत आहे. सोलापूर शहरातील मुरारजी पेठ (रेल्वे लाईन) येथील रहिवासी पवनसिंग चव्हाण यांनी 'अमृत पर्यटन' या पोर्टलवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली होती. या नोंदणीनंतर त्यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून ग्राहकांचे फोन आणि बुकींगमध्ये मोठी वाढ झाली आहे.
'अमृत पर्यटन' च्या माध्यमातून चव्हाण यांच्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला एक भक्कम डिजिटल व्यासपीठ व बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या पर्यटनाच्या विविध पॅकेजेसना आणि वाहन सेवेला ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. व्यवसायातील या सकारात्मक बदलामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
'अमृत' संस्थेच्या पर्यटन उपक्रमाशी जोडले गेल्याने व्यवसायाचा प्रसार वाढला आणि उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पवनसिंग चव्हाण यांनी सांगितले. योग्य मार्गदर्शन आणि डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून, "अमृत संस्थेच्या पर्यटन उपक्रमात नोंदणी केल्यामुळे माझ्या व्यवसायाला नवी ओळख मिळाली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद खूप छान असून बुकिंग वाढल्या आहेत. नवउद्योजकांना व व्यावसायिकांना प्रोत्साहन देणाऱ्या 'अमृत' संस्थेचे मनापासून आभार मानले आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क:- ९११२२२८७६८
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment