मालवण तालुका ब्राह्मण संमेलनात 'अमृत'च्या योजनांविषयी उत्सुकता

अधिकाधिक जणांनी व्यक्त केली लाभ घेण्याची इच्छा

मालवण तालुका ब्राह्मण संमेलनात 'अमृत'च्या योजनांविषयी उत्सुकता मुख्य फोटो
मालवण तालुका ब्राह्मण संमेलनात 'अमृत'च्या योजनांविषयी उत्सुकता अतिरिक्त फोटो

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे तालुका ब्राह्मण स्नेहसंमेलनाचा वार्षिक कार्यक्रम नुकताच पार पडला. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेला योजनांची माहिती देण्यासाठी या संमेलनात आमंत्रित करण्यात आले होते. अमृत संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी या संमेलनात अमृत संस्थेच्या योजनांची माहिती दिली. या संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण समाजाचा समावेश होतो. त्यामुळे या संस्थेच्या विविध योजनांचा उपयोग करून घेऊन ब्राह्मण समाजाला उन्नती साधता येईल, असे त्यांनी सांगितले.

अमृत वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, अमृत बेकरी प्रशिक्षण, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण, अमृत आयात-निर्यात प्रशिक्षण, अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षण, तसेच अमृत कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून घेतले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रम यांची माहिती केळखर यांनी दिली. अमृतपेठ या नव्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबतही माहिती देण्यात आली.

या वेळी तालुका ब्राह्मण संघाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद तुळपुळे, पदाधिकारी मंदार सरजोशी, तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. मणेरीकर उपस्थित होते. निमंत्रित प्रमुख वक्ते श्रीधर काळे यांचे पंचपरिवर्तन या विषयावर व्याख्यान झाले. तसेच सौ. मेघना जोशी यांनी महिलांचे सशक्तीकरण या विषयावर भाष्य केले. अध्यक्षीय भाषणात दुर्गाप्रसाद तुळपुळे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सर्वांना केले. तसेच अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे आभार मानले.

या संमेलनाला तालुक्यातील दीडशेहून अधिक जण उपस्थित होते. सर्वांनी संस्थेच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त करतानाच लाभ घेण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली. त्यामुळे अमृत संस्थेचे काम मालवण तालुक्यात वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Shriram Kelkar News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 08:40 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: sindhudurg Related district of the news
Publisher: Shriram Kelkar News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 08:40 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: sindhudurg Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words