संभाजीनगर येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचा सन्मान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उत्कृष्ट जिल्हा महाविद्यालय म्हणून सन्मान

संभाजीनगर येथील  श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचा  सन्मान मुख्य फोटो
संभाजीनगर येथील  श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचा  सन्मान अतिरिक्त फोटो

लातूर: येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागात शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये केलेल्या विविध ऍक्टिव्हिटीज, महाविद्यालयात संपन्न झालेल्या विविध कार्यशाळा, शैक्षणिक वर्ष २५-२६ मध्ये महाविद्यालयाने केलेल्या समाजाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास, जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि समुदाय विकासाच्या क्षेत्रात केलेल्या विस्तार उपक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी सहभाग व समुदाय सहभाग अशा विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तसेच महाविद्यातील आजीवन शिक्षण विस्तार विभागाकडून राबविलेले विविध उपक्रमाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षभरातील या उत्कृष्ट कार्याबद्दल उत्कृष्ट जिल्हा महाविद्यालय म्हणून श्री सिद्धेश्वर महाविद्यालयास , उत्कृष्ट प्राचार्य म्हणून प्राचार्य प्रो.डॉ. मुकुंद देवर्षी, आणि उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून प्रा. सुरेश बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला.

हा सन्मान जीएमएनआरडीचे माजी संचालक, अर्थशास्त्रज्ञ प्राचार्य डॉ.सर्जेराव ठोंबरे, प्रकुलगरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.आश्विन रांजणीकर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, डॉ.आनंद वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास नॅक समन्वयक डॉ.विकस बोरगावकर, लोकप्रशासन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील पाटील उपस्थित होते.

याबद्दल भा. शि.प्र.संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे, स्थानिक संकुलाचे पालक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश दुगड, स्थानिक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, कार्यवाह अँड. विश्वास जोशी यांनी या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर सपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 21-08-2026 News publication date | Time: 03:26 PM News publication time | Views: 47 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 21-08-2026 News publication date | Time: 03:26 PM News publication time | Views: 47 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement