गोंदिया जिल्ह्यात अमृतच्या वतीने EDP प्रशिक्षणाला सुरुवात

दोन बॅचेसचा शुभारंभ; लाभार्थ्यांना व्यवसाय विस्तार, शासकीय योजना व प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याबाबत मार्गदर्शन

गोंदिया जिल्ह्यात अमृतच्या वतीने EDP प्रशिक्षणाला सुरुवात मुख्य फोटो
गोंदिया जिल्ह्यात अमृतच्या वतीने EDP प्रशिक्षणाला सुरुवात अतिरिक्त फोटो

गोंदिया : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात EDP (Entrepreneurship Development Programme – उद्योजकता विकास कार्यक्रम) प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या दोन ठिकाणी EDP प्रशिक्षणाच्या बॅचेस सुरू करण्यात आल्या असून, लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच व्यवसाय यशस्वीपणे चालवून त्याचा विस्तार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. EDP प्रशिक्षणाची पहिली बॅच अमृत जिल्हा कार्यालय, गोंदिया येथे दि. १९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. तर दुसरी बॅच बिरसी (एअरपोर्ट), ता. गोंदिया येथे दि. २० ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश लाभार्थ्यांना उद्योजकता व व्यवसायाशी संबंधित व्यावहारिक माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशिक्षणादरम्यान व्यवसायाची सुरुवात कशी करावी, व्यवसायाचा विस्तार कसा करावा, बाजारपेठेची गरज कशी समजून घ्यावी, ग्राहकांपर्यंत उत्पादने व सेवा कशा पोहोचवाव्यात तसेच व्यवसायाचे योग्य नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीही लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. विशेषतः CMEGP (Chief Minister Employment Generation Programme) आणि PMEGP (Prime Minister's Employment Generation Programme) यांसारख्या योजनांचा लाभ कसा घेता येतो, अर्ज प्रक्रिया काय आहे तसेच या योजनांच्या माध्यमातून उद्योग व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य कसे मिळवता येते, याबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, व्यवसायाची अंदाजित गुंतवणूक व उत्पन्नाचे नियोजन कसे करावे, बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे कोणती आहेत तसेच व्यवसाय व्यवस्थितपणे चालविण्यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या EDP प्रशिक्षणाच्या माध्यमातून लाभार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य, व्यावसायिक समज आणि आत्मनिर्भरता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे युवक व इच्छुक लाभार्थींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळणार असून, जिल्ह्यात स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात दोन ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या EDP प्रशिक्षणामुळे स्थानिक पातळीवर नवीन उद्योजक घडविण्यास तसेच त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडून आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 21-08-2026 News publication date | Time: 01:58 PM News publication time | Views: 88 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 21-08-2026 News publication date | Time: 01:58 PM News publication time | Views: 88 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

O
Omkar bolte
21-08-2026 04:29 PM

अती उत्तम अरे वा .... सर आता EDP अमृत पेठ मस्त आहे तुमचा

Write a Comment
0 / 50 words
Advertisement