सांगली येथील प्रज्ञा प्रबोधिनी शाळेच्या मुख्याध्यापकांना पराक्रम दिनाचे निवेदन

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या शौर्य, धाडस, कुशल नेतृत्व आणि प्रभावी युद्धनीतीच्या जोरावर इतिहासात निर्माण केलेले स्थान विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

सांगली येथील प्रज्ञा प्रबोधिनी शाळेच्या  मुख्याध्यापकांना पराक्रम दिनाचे निवेदन मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली, दि. २० ऑगस्ट : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पराक्रम दिन उपक्रमाची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सावकार प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुबोध सुरेश कुलकर्णी यांना पराक्रम दिनाचे पत्र देण्यात आले. या पत्राद्वारे पराक्रम दिनाच्या आयोजनाची माहिती देत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या शौर्य, धाडस, कुशल नेतृत्व आणि प्रभावी युद्धनीतीच्या जोरावर इतिहासात निर्माण केलेले स्थान विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. अमृत संस्थेच्या सांगली जिल्हा कार्यालयाच्या वतीने विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थांशी संपर्क साधून पराक्रम दिनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. *अमृत संस्थेविषयी :-* अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे


संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. https://mahaamrut.org.in/ *अधिक माहिती साठी संपर्क : ९११२२२८७६६ /७०५७६०७४१९ /७९७२८३०७५७ महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली ४१६४१६

Publisher: Gouri Kulkarni News publisher name | Date: 21-08-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 13 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: Gouri Kulkarni News publisher name | Date: 21-08-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 13 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement