छत्रपती संभाजीनगर येथील अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात २१ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात आलेले दहा दिवसांचे EDP प्रशिक्षण पूर्ण झाले.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे (EDP) प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले.
२१ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या दहा दिवसांच्या प्रशिक्षणात एकूण १० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
या प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, व्यवसायाचे नियोजन कसे करावे, व्यवसायाच्या संधी कशा ओळखाव्यात आणि उद्योजक म्हणून पुढे जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. दहा दिवसांचा EDP कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी आवश्यक कागदपत्रे अमृतच्या पोर्टलवर अपलोड केली.
त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याची प्रक्रिया करून सर्व प्रशिक्षणार्थींचे प्रमाणपत्र तयार करण्यात आले.
आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना EDP प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. विजयजी जोशी सर यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतात; मात्र त्या अडचणींना घाबरून न जाता मेहनत, योग्य नियोजन आणि सातत्य ठेवून पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.
तसेच, “तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे जात असताना अमृत सदैव तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. पुढील व्यावसायिक वाटचालीस त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमितजी सामंत, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत सखी मंजू कुलकर्णी आणि ऋचा शर्मा यांची उपस्थिती होती.
यावेळी राजेंद्र पानट, विजय जोशी, विनायक देशपांडे, मयूर नाईक, वंदना देशमुख, संतोष भालेराव, तुषार कडतू, रेणुका बुगदे, सुनंदा देशपांडे आणि अभिजीत भातलोंढे यांना EDP प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमने केले. प्रशिक्षण सुरू झाल्यापासून प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रशिक्षणार्थींना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन टीमच्या वतीने देण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५ / 9403200606 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment