अमृत बीड जिल्हा कार्यालयात श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी

बीड : अमृत जिल्हा कार्यालय, बीड येथे अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती तथा पराक्रम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

अमृत बीड जिल्हा कार्यालयात श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी मुख्य फोटो
अमृत बीड जिल्हा कार्यालयात श्रीमंत बाजीराव पेशवे जयंती उत्साहात साजरी अतिरिक्त फोटो

बीड : अमृत जिल्हा कार्यालय, बीड येथे अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती तथा पराक्रम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठाण चे प्रा. डॉ. अजिंक्य पांडव, संस्कार विद्यालयातील प्रा. प्रेरक वैद्य , श्री त्रिंम्बक देशपांडे, इतिहास संकलन परिषदेचे श्री मुकुंद कुलकर्णी व विघ्नहर्ता मित्र मंडळाचे अध्यक्ष शुभम जोशी आणि श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा, राष्ट्रनिष्ठेचा, नेतृत्वगुणांचा आणि गौरवशाली इतिहासाचा उपस्थितांसमोर आढावा मांडला.

यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. विशाल जोशी यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच अमृतच्या वतीने पराक्रम दिन साजरा करण्यामागील उद्देश आणि ऐतिहासिक महापुरुषांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य, धाडसी नेतृत्व आणि दूरदृष्टीच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांच्या पराक्रमातून शौर्य, धैर्य, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वाची प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी बीबीएनएचे डॉ. धनंजय रामदासी आणि श्री. सागर कुलकर्णी यांच्यासह डॉ. सुहास देशपांडे, प्रा. श्रीकांत कुलकर्णी, ॲड. अक्षय भालेराव, श्री. संजय मामा खंदाट, श्री. सतीश देशपांडे, श्री. महेश कुलकर्णी, श्री. शैलेश कुलकर्णी, श्री. अनिल जोशी, श्री. सुमित धसे, डॉ. विनोद मुळे, श्री. संजय कुक्कडगांवकर, श्री. आकाश जवकर, श्री. रोहित कुलकर्णी, श्री. राहुल जोशी, श्री. वैभव जोशी यांच्यासह अनेक बाजीराव पेशवेप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या प्रेरणादायी कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४६८

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 20-08-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 20-08-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement