अमृत पंधरवड्यात परभणी कार्यालय बारा तास राहणार खुले

नव्या वर्षाचा पहिला पंधरवडा अतिरिक्त सेवेचा

अमृत पंधरवड्यात परभणी कार्यालय बारा तास राहणार खुले मुख्य फोटो
अमृत पंधरवड्यात परभणी कार्यालय बारा तास राहणार खुले अतिरिक्त फोटो

परभणी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या परभणी जिल्हा कार्यालयाने अमृत पंधरवडा असा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. एक जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत अमृत संस्थेचे परभणी कार्यालय १२ तास (सकाळी ९ ते रात्री ९) खुले असणार आहे. या अतिरिक्त वेळेमध्ये लाभार्थ्यांच्या अडचणी, प्रलंबित कामांचा निपटारा, लक्ष्यित गटातील मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी, अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण कार्यक्रम आदी कामे केली जाणार आहेत. या संधीचा लक्ष्यित गटातील नागरिकांनी जास्तीत उपयोग करून घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
मोबाइल : 7391065473

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 04:32 PM News publication time | Views: 203 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 04:32 PM News publication time | Views: 203 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words