वर्धा जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) वर्धा जिल्हा कार्यालय येथे अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, नेतृत्वगुण, राष्ट्रनिष्ठा आणि अद्वितीय युद्धनीतीचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला अक्षयजी शिंगरुप,अभिषेकजी देशपांडे, विकासजी दांडगे व इतर नागरिक उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क: अमृत वर्धा जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन,वर्धा
मोबाइल नंबर:-9112227632
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment