महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठी संधी.
अमृतपेठचे “महाड ” रायगड येथे आयोजन
“महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ’ उपक्रम
रायगड जिल्ह्यातील वीरेश्वर मंदिर सभागृह महाड येथे” संपन्न होत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाना विनंती आहे की, आपण अमृतपेठ येथे सहकुटुंब भेट देऊन नव ऊदयोजकाना प्रोत्साहित करावे.
महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठी संधी.
या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, लघुउद्योगाला चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती याकरिता स्थानिक लघु उद्योजक, लक्षित गटातील वीविध व्यवसायीक प्रशिक्षणे घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, विक्री कौशल्य वाढावे याकरिता व्यवस्थापकीय संचालक (अमृत) यांची संकल्पना असलेल्या महाड अमृत पेठचे आयोजन केले आहे.
श्री. विरेश्वर मंदिर सभागृह, महाड (जि. रायगड) येथे अमृत पेठ शुक्रवार ते रविवार म्हणजे २१,२२,२३ ऑगस्ट रोजी होणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यन्त बाजारपेठ खुली आसणार आहे.
रोज तीन लकी ड्रॉ ओपन होणार त्यात आपल्या वामन हरी पेठे यांच्या कडून भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
आधिक माहिती साठी संपर्क :- रायगड जिल्हा व्यवस्थापक ९११२२२८७५९ श्री शैलेश मराठे ९४२३८९२१८२ कु मंगेश ढेबे ८१४९५५२१४३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment