सांगली येथील श्री. वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे चेअरमन समीर बिरनाळे यांना अमृत पराक्रम दिनाचे पत्र

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि कार्याची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पराक्रम दिन उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.

सांगली येथील श्री. वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे चेअरमन समीर बिरनाळे यांना अमृत पराक्रम दिनाचे पत्र मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली, दि. १९ ऑगस्ट : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पराक्रम दिन उपक्रमाची माहिती देणारे पत्र श्री.वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्ट, सांगलीचे चेअरमन श्री. समीर बिरनाळे यांना देण्यात आले.

यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि कार्याची माहिती समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पराक्रम दिन उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तसेच या उपक्रमात संस्थेच्या शाळा व सर्व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

अमृत संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमातून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह त्यांच्या शौर्य आणि पराक्रमातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात येत आहे. यावेळी अमृत सांगली जिल्हा कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*अधिक माहिती साठी संपर्क :

९११२२२८७६६ /७०५७६०७४१९ /७९७२८३०७५७

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)

अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,

राजवाडा, सांगली ४१६४१६

अमृत संस्थेविषयी : अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

संकेतस्थळ- https://mahaamrut.org.in/

Publisher: सौ गौरी महेश कुलकर्णी News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 04:58 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: सौ गौरी महेश कुलकर्णी News publisher name | Date: 19-08-2026 News publication date | Time: 04:58 PM News publication time | Views: 29 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement