श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
पराक्रमी योद्धा बाजीराव पेशवे यांचा इतिहास सर्वसामान्य जनतेला कळावा आणि त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या ,नेतृत्वाच्या घटना प्रत्येक युवकाच्या काळजात रुजाव्यात त्या करिता अमृत तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात पराक्रम दिन हा उत्सव साजरा होत आहे. त्याच प्रमाणे १८ ऑगस्ट ला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती अमृतच्या कार्यालयात साजरी करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
थोरले पेशवे बाजीराव बल्लाळ यांनी आपल्या कारकीर्दीत एकही युद्ध हारले नाही, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठा साम्राज्याचा विस्तार केला व श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या अभिमानाला उंचावले , अशा पराक्रमी,अजिंक्य योद्धाला त्रिवार वंदन!! पराक्रम दिन स्पर्धे मधे भाग घेण्याकरिता वेबसाईट:-
https://parakramdin.mahaamrut.org.in/#competitions
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Kartik tiwari
थोरले बाजीराव पेशवे....... जय महाराष्ट्र
Write a Comment